Notice: Undefined index: in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 30

Notice: Trying to get property 'slug' of non-object in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 36

History

विश्‍व हायटेक नर्सरीविषयी…

 

अवघ्या जगाची भूक भागविणारा आणि शतकानुशतके चालत आलेला परंपरागत मात्र आधुनिकतेची जोड मिळालेला व्यवसाय म्हणून शेतीची ओळख आहे. एवढेच नव्हे तर देशाच्या सकल उत्पन्नात मोठा वाटा असलेला शेती व्यवसाय भारत देशाला विकसित राष्ट्रांच्या यादीत स्थान देण्यासाठी कष्ट उपसत आहे. यातूचनच शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी शेतीला नाविन्याची जोड मिळत आहे. त्यानुसारच व्यापक दृष्टीकोन पुढे येऊन नर्सरी व्यवसायाची निर्मिती झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून 30 मार्च, 2006 रोजी ‘विश्‍व हायटेक नर्सरी’ची स्थापना करण्यात आली. अवघ्या 5 गुंठे क्षेत्रात सुरू केलेल्या नर्सरीचा प्रवास शेतकऱ्यांच्या विश्‍वासाच्या बळावर 16 वर्षांत तब्बल 16 एकर क्षेत्रात पसरला आहे. ‘विश्‍वासाचे एकच नाव’ ह्या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत पॉलिहाऊस, टनेल हाऊसच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान व संसाधने यांचा वापर करून किफायतशीर दरात उच्च प्रतीच्या गुणवत्तेची दर्जेदार रोपे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच केली जातात. भारतातील नामांकित बियाणे कंपन्या सिजेंटा, बायर, क्लॉज, वेलकम आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते असल्याने शेतकऱ्यांना विश्‍वसनीय, दर्जेदार व किफायतशीर किंमतीत रोपे पुरवठा करणाऱ्या नर्सरींमध्ये विश्‍व हायटेक नर्सरी अग्रभागी राहिली आहे. याचबरोबर शंभराच्या वर मजूर दैनंदिन काम करत असल्याने त्यांना हक्काचा रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. तर विश्‍व फाऊंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान देत असते. यामुळेच महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरील राज्यांतही रोप पुरविणारी नर्सरी म्हणून विश्‍व हायटेक नर्सरीने शेतकऱ्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं आहे. याच बळावर शेतकऱ्यांचे जीवन अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दिशेने नर्सरी समर्पित भावनेने काम करत आहे.