नर्सरीच्या संपूर्ण व्यवस्थापन मंडळावर नियंत्रण ठेवतात. व्यवस्थापनाची सर्व मार्गदर्शक मूल्ये आणि तत्त्वांनुसार संपूर्ण कामकाजाचे नियंत्रण करुन अंमलबजावणी करतात. रोपांची निर्मिती ते थेट पुरवठा होईपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना, मार्गदर्शन करुन प्रोत्साहन देतात. कंपनीच्या प्रगतीचा आलेख गुणवत्ता, विश्वासार्हता आणि दर्जाच्या जोरावर उंचावर ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतात. एकूणच शेतकरी केंद्रबिंदू मानून असंख्य शेतकऱ्यांना जोडणे आणि संस्थेची ध्येय धोरणे निश्चित करतात.
नर्सरीच्या सेवा विभागातील सर्व घटकांना कामांची रुपरेषा आखून देणे, अंमलबजावणी करणे, वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय तडीस नेतात. संस्थेच्या कामकाजात ऐनवेळी काम निघाल्यास तत्काळ निर्णय घेऊन पूर्तता करतात. शेतकऱ्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांना येणाऱ्या अडी-अडचणींवर मार्ग काढतात आणि मार्गदर्शन करतात.
संस्थेचा सर्वात महत्त्वाचा आत्मा म्हणून विपणन विभाग गणला जातो. विपणनाबाबतचे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याबरोबर वेळोवेळी विपणन प्रतिनिधींना सूचना व मार्गदर्शन करतात. बाजारात संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना परिचित होण्यासाठी नवनवीन संकल्पना राबवितात. याचबरोबर शेतकऱ्यांना उत्पादनांविषयी अचूक माहिती देऊन त्यांना पडलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देतात.
नर्सरीच्या सर्व जमा-खर्चाची नोंद ठेवण्यासहीत ताळेबंद तयार करतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन करतात. यासह सर्व नोंदी संचालकांना सादर करुन मंजुरी घेतात. अनपेक्षितपणे नर्सरीतील घटकांना येणाऱ्या खर्चाबाबतच्या अडचणींचे निराकरण करतात.
उत्पादित रोपे व्यवस्थित आणि वेळेत शेतकऱ्यांना पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावतात. या विभागातील घटकांना व वाहनांना उद्भवणाऱ्या समस्यांचा तत्काळ निपटारा करुन दररोज वाहतूक विभागाच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करतात.
नर्सरीची ध्येयधोरणे ठरविण्यात सहभाग घेणे. कंपनीचा नावलौकिक सतत उंचावर नेण्यासाठी काम करणे. याचबरोबर कंपनीतील सर्वच कामांना व उपक्रमांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी देणे.
विपणन व्यवस्थापकांनी दिलेले काम पूर्ण करुन त्याच्या नोंदी ठेवणे. याबरोबरच ऐनवेळी आलेली कामे पूर्ण करणे. विपणन करण्यासाठी दिलेल्या क्षेत्राची आणि वाणाची नोंद ठेवून वरीष्ठांना सादर करणे.
विपणन व्यवस्थापकांनी दिलेल्या कामाची पूर्तता करणे. याचबरोबर क्षेत्रीय कामकाजाच्या नोंदी ठेवून वरीष्ठांना सादर करणे. नवनवीन वाणांची माहितीही शेतकऱ्यांना देणे.
नर्सरी व्यवस्थापनातील अतिशय महत्त्वाचा विभाग म्हणून विक्री विभाग गणला जातो. नर्सरीतील उपलब्ध रोपांची शेतकऱ्यांना माहिती देऊन विक्रीबाबत संवाद साधतात. याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेऊन वरीष्ठांना कळवितात.