मागील वर्षी टोमॅटो पिकावर आलेल्या समस्या व उपाय…

मागील वर्षी टोमॅटो पिकावर आलेल्या समस्या व उपाय…

मागील वर्षी टोमॅटो पिकात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी आणि 15 फेब्रुवारीपर्यंत केलेल्या लागवडींमध्ये मोठ्या प्रमाणात फळे पिवळे पडणे, फळ वेडी-वाकडे होणे व इतर समस्या अकोले, संगमनेर, राहुरी, जुन्नर, नारायणगाव, सिन्नर व फलटण तालुक्यांमध्ये दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सदर फळे कृषी विभागामार्फत बेंगलोर येथील आयसीएआर येथे पाठविले असता त्यात मोठ्या प्रमाणात कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याचे निष्कर्ष आले. तसेच या रोगाची लागण व प्रसार मावा (ॲफिडस) या किडीमुळे होत असल्याचे निदर्शनास आले होते. ही कीड आपल्या भागात साधारणतः हिवाळी ऋतुत दिसून येते. त्यामुळे यावर्षी याबाबत काय काळजी घेता येईल हे बघूया…

  1. सर्वप्रथम सीएमव्ही या विषाणूजन्य रोगास प्रतिकारक वाणाची लागवड करावी, परंतु आज तरी प्रतिकारक टोमॅटोची जात आपल्याकडे उपलब्ध नाही.
  2. मावा कीड टोमॅटो पिकावर येऊ नये म्हणून टोमॅटो प्लॉटला सात फूट उंचीची इन्सेक्ट नेट लावावी.
  3. टोमॅटो पिकाच्या चारही बाजूंनी उंच अशा मका पिकाची दाट लागवड करावी.
  4. टोमॅटो पिकात पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.
  5. मावा कीड टोमॅटो पिकावर दिसून आल्यानंतर योग्य अशा कीटकनाशकांचा वापर करावा.
  6. टोमॅटो पिकात नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा व पोटॅशयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात करावा. त्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहील.
  7. ज्या भागामध्ये मागील वर्षी या रोगाचा प्रादुर्भाव दिसला होता, त्या भागात हिवाळ्यात शक्यतो लागवड करु नये.
  8. नर्सरीमध्ये या किडीची लागण होवू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी.
  9. बियाणे कंपनीने देखील मोठ्या प्रमाणात बियाणांची चाचणी करावी जेणेकरुन याची लागण बियाणातून होणार नाही.
    विश्‍व हायटेक नर्सरीमध्ये टोमॅटो रोपांची निर्मिती करताना पूर्णपणे पॉलिहाऊस व टनेल (इन्सेक्ट नेट) वापर करुनच केली जाते. त्यामुळे पूर्णपणे निरोगी रोपेच शेतकऱ्यांना दिली जातात. टोमॅटो पिकातील योग्य जाती व उत्कृष्ट रोपांसाठी कुठलीही समस्या असल्यास आपण विश्‍व हायटेक नर्सरी येथे संपर्क करावा.
  • वीरेंद्र थोरात-संचालक, विश्‍व हायटेक नर्सरी, वीरगाव (9850530136)
    रोपे बुकींगकरिता संपर्क क्रमांक – 8888801892/93
    अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक – 8888801890/91

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply