Notice: Undefined index: in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 30

Notice: Trying to get property 'slug' of non-object in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 36

कृषी प्रदर्शनात ‘विश्‍व हायटेक नर्सरी’चा स्टॉल ठरला आकर्षण

 

अकोले / प्रतिनिधी

राहाता तालुक्यातील बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) तर्फे आंबा महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यात ‘विश्‍व हायटेक नर्सरी’चा स्टॉल हा शेतकऱ्यांचा खास आकर्षण ठरला.

शेतकऱ्यांना व शेती अभ्यासकांना नवनवीन तंत्रज्ञान व उत्पादनांची माहिती व्हावी. या हेतूने बाभळेश्‍वर येथे आंबा महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे आयोजन पायरेन्सतर्फे करण्यात आले होते. यामध्ये शेती संबंधित अनेक स्टॉल्स लागलेले होते. यात विश्‍व हायटेक नर्सरीचा स्टॉल हा शेतकऱ्यांचा खास आकर्षण ठरला. अनेक शेतकऱ्यांनी स्टॉलला भेट देऊन नर्सरीचे प्रतिनिधी अविनाश भागवत व सागर वाकचौरे यांच्याकडून रोपांची माहिती जाणून घेतली. तसेच नर्सरीने नुकताच सुरू केलेला फॅनपॅड प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व उच्च गुणवत्तेची कलम (ग्राफ्टिंग) टोमॅटो, कलिंगड, मिरची, झेंडू, शेवंती ही रोपे उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी पायरेन्स संस्थेचे प्रमुख तथा वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर यांनीही स्टॉलला आवर्जुन भेट देऊन माहिती जाणून घेतली.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply