Notice: Undefined index: in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 30

Notice: Trying to get property 'slug' of non-object in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 36

‘विश्‍व हायटेक नर्सरी’च्या विश्‍वासार्हतेवर ‘पुन्हा’ शिक्कामोर्तब

कोपरगाव / प्रतिनिधी

केवळ रोपे पुरविणे एवढीच जबाबदारी न मानता विश्‍व हायटेक नर्सरी शेतकऱ्यांना सदोदित सल्ला व मार्गदर्शन करत आहे. त्याचा परिपाक म्हणजे जवळके (ता.कोपरगाव) येथील प्रयोगशील शेतकरी प्रसाद दरेकर यांना टोमॅटोतून आत्तापर्यंत 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जर बाजारभाव टिकून राहिले तर अजूनही 10 लाख रुपये वाढतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रयोगशील शेतकरी प्रसाद दरेकर हे नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी आले असता त्यांना टोमॅटो लागवडीबाबत नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी दोन एकरवर टोमॅटोची लागवड केली. सध्या त्यांची काढणी सुरू असून, आत्तापर्यंत 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. जर असेच बाजारभाव टिकून राहिले तर अजूनही 10 लाख रुपये होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे आम्ही यशस्वी झालो आणि गेल्या दोन वर्षांपासूनचे नुकसान भरुन आले अशी प्रतिक्रियाही दरेकर यांनी दिली. या आनंदात शेतकरी प्रसाद दरेकर यांनी संपूर्ण नर्सरी परिवाराला पेढे वाटप करुन आनंद द्विगुणित केला. कधी नव्हे एवढा नफा यावर्षी मिळाल्याने त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब सध्या आनंदात आहे.

विश्‍व हायटेक नर्सरीने कायमच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. त्यानुसार नर्सरीचा प्रत्येक घटक काम करत आहे. केवळ एका सल्ल्यामुळे टोमॅटोत भरघोस उत्पादन निघून चांगले उत्पन्न मिळाले. यावरुन पुन्हा एकदा नर्सरीच्या विश्‍वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply