वीरेंद्र थोरात यांना ‘आदर्श उद्योजक’ पुरस्कार प्रदान

वीरेंद्र थोरात यांना ‘आदर्श उद्योजक’ पुरस्कार प्रदान

वीरगाव/प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेने तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता.25) वीरगाव येथील विश्‍व हायटेक नर्सरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र थोरात यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘आदर्श उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामुळे विश्‍वच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

गेल्या सोळा वर्षांच्या वाटचालीत विश्‍व हायटेक नर्सरीने कायमच शेतकऱ्यांचे हित जोपासून शेतीमध्ये क्रांती घडवली आहे. याबद्दल नर्सरीवर विविध संस्थांनी आणि व्यक्तींनी कौतुकाची थाप दिलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर करुन तयार केलेली दर्जेदार रोपे शेतकऱ्यांना अल्पदरात थेट बांधावर पोहोच करतात. यावरच न थांबता शाश्‍वत शेतीसाठी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाते. याच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन युवा स्वाभिमान सामाजिक संघटनेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त ‘आदर्श उद्योजक’ म्हणून विश्‍व हायटेक नर्सरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र थोरात यांना पुरस्कार देऊन गौरिवले. त्यांच्यावतीने विपणन व्यवस्थापक अविनाश भागवत, विक्री व्यवस्थापक संतोष भालेराव आणि विपणन प्रतिनिधी सागर वाकचौरे यांनी खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ.किरण लहामटे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर, संघटेनेचे संस्थापक तथा अगस्ति कारखान्याचे संचालक महेश नवले, संघटनेचे अध्यक्ष सुरेश नवले आदिंच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी संघटनेचे संस्थापक महेश नवले यांनी महाराष्ट्रात सर्वात विश्‍वसनीय आणि मोठी नर्सरी आमच्या अकोले तालुक्यातील वीरगाव येथे असल्याचा आम्हांला अभिमान आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपे देऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन देतात. यामुळे खरोखरच ते या पुरस्काराचे मानकरी असल्याचे गौरवोद्गगार काढले. या पुरस्काराबद्दल विश्‍व हायटेक नर्सरीवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply