शांताराम आव्हाड यांचा विश्व हायटेक नर्सरीकडून सत्कार
वीरगाव/प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम भिमाजी आव्हाड यांची नुकतीच भाजप तालुकाध्यक्ष आणि महाराष्ट्र शेतकरी संघटना अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा सोमवारी (ता.4) विश्व हायटेक नर्सरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र थोरात यांच्या हस्ते नर्सरी कार्यालयात (वीरगाव, ता.अकोले) सत्कार करण्यात आला.
शांताराम आव्हाड यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करुन स्थैर्य मिळविलेले आहे. विश्व हायटेक नर्सरीशी त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहे. त्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना कायमच प्रेरणा मिळत आहे. याचबरोबर त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील कर्तृत्व गाजवलेलं आहे. त्यांची सिन्नर भाजप तालुकाध्यक्षपदी आणि महाराष्ट्र शेतकरी संघटना अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा विश्व हायटेक नर्सरीतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य व्यवस्थापक अविनाश बोडखे, सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, गुणवत्ता नियंत्रक विभागप्रमुख भानुदास भालेराव, लेखापाल लहुजी दातखिळे, विक्री व्यवस्थापक संतोष भालेराव, विपणन व्यवस्थापक अविनाश भागवत, वाहतूक व्यवस्थापक किशोर वाकचौरे, विपणन प्रतिनिधी वैभव भारती, सागर वाकचौरे, संतोष अस्वले, रवी आंबरे, सुमित मेंगाळ, अश्विनी दातीर उपस्थित होते.