माहिम येथे कार्यालय सुरू झाल्याने शेतकऱ्यांना विनम्र व तत्पर सेवा मिळेल : नरेंद्र ठाकूर माहिम येथे विश्‍व हायटेक नर्सरीच्या नूतन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

माहिम येथे कार्यालय सुरू झाल्याने शेतकऱ्यांना विनम्र व तत्पर सेवा मिळेल : नरेंद्र ठाकूर

माहिम येथे विश्‍व हायटेक नर्सरीच्या नूतन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

वीरगाव/प्रतिनिधी 

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती अधिक गतिमान करण्यासाठी विश्‍व हायटेक नर्सरीची मोठी मदत होणार आहे. माहिम येथे कार्यालय सुरू झाल्याने शेतकऱ्यांना विनम्र व तत्पर सेवा मिळेल, असा विश्‍वास भारतीय क्रिकेटर शार्दुल ठाकूरचे वडील तथा माहिम सोसायटीचे माजी अध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला.

विश्‍व हायटेक नर्सरीने गेल्या सोळा वर्षांत गुणवत्ता आणि विश्‍वासाच्या बळावर शेतकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दिवसेंदिवस वाढणारी मागणी, तत्पर सेवा आणि शेतकऱ्यांचा हक्काचा मित्र म्हणून सल्ला व मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीकोनातून पालघर जिल्ह्यातील माहिम येथे नर्सरीच्या नूतन कार्यालयाचे रविवारी (ता.10) मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले.

 

शेतकऱ्यांना जलद व सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील माहिम येथे नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पिंपळ बाजार येथील प्रणय स्मृती बंगल्यात हे नूतन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून नर्सरीने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्पर सेवा दिली आहे. याचबरोबर गावांसह वाड्या-वस्त्यांवर जावून मर रोगावरील उपाय देवून मार्गदर्शन केले असल्याचे सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे यांनी यावेळी नमूद केले. या उद्घाटन प्रसंगी जगदीश राऊत, जयेश राऊत, विजय पाटील, उमाकांत राऊत, धनेश पाटील, बाळू सावे, राजेंद्र राऊत, विवेक सावे, प्रकाश मोरे, दिलीप केवसकर, पंकज पटकर, विकास राऊत, सुनील पाटील आदी शेतकऱ्यांसह नर्सरीचे विपणन प्रतिनिधी अमित पाटील उपस्थित होते.

 

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply