पाटील बायोटेकच्या शिष्टमंडळाची विश्व हायटेक नर्सरीला सदिच्छा भेट
वीरगाव/प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वीरगाव येथील नामांकित विश्व हायटेक नर्सरीला जळगाव येथील पाटील बायोटेक प्रायव्हेट कंपनीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.19) सदिच्छा भेट देवून माहिती घेतली. याचबरोबर नर्सरीच्या सूक्ष्म नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
विश्व हायटेक नर्सरी व पाटील बायोटेक या दोन्हीही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. नर्सरीने गुणवत्ता व विश्वासाच्या बळावर शेतकऱ्यांशी अतूट नाते निर्माण केले आहे. यामध्ये पाटील बायोटेकचा देखील सिंहाचा वाटा आहे. मंगळवारी खासकरुन कंपनीच्या शिष्टमंडळाने नर्सरीला सदिच्छा भेट दिली. विशेषत्वाने संपूर्ण परिसराची पाहणी करत इत्यंभूत माहिती घेतली आणि गुणवत्ता व दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी कंपनीने रोपांना चमक येण्यासाठी प्रायोगिक तत्वावर नुकतेच संशोधन करुन निर्माण केलेले औषध दिले. या शिष्टमंडळात पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे उपसामान्य व्यवस्थापक अमोल पाटील, विभागीय व्यवस्थापक नितीन मोरे, क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक सुनील डोंगरे, श्रीनिवास कृषी सेवा केंद्राचे संचालक संतोष कडलग यांचा सहभाग होता. तर नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी नर्सरी आणि कृषीविषयी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी नर्सरीचे मुख्य व्यवस्थापक अविनाश बोडखे, सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, गुणवत्ता नियंत्रण विभाग प्रमुख भानुदास भालेराव, लेखापाल लहुजी दातखिळे, बियाणे रोपण विभाग प्रमुख योगेश देशमुख, विक्री व्यवस्थापक संतोष भालेराव, वाहतूक व्यवस्थापक किशोर वाकचौरे, विक्री प्रतिनिधी रवींद्र आंबरे, अश्विनी दातीर, विपणन प्रतिनिधी संतोष अस्वले, सागर वाकचौरे, सुमित मेंगाळ आदी उपस्थित होते.