विश्व हायटेक नर्सरीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
वीरगाव/प्रतिनिधी
गेल्या सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या अखंड सेवेत असणाऱ्या विश्व हायटेक नर्सरीने विश्वास, गुणवत्ता व दर्जा या बळावर नावलौकिक मिळविला आहे. कोविडच्या भयावह संकटातही न थांबता अविरतपणे सेवा दिली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याबरोबर नर्सरीत अविश्रांतपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही कायमच हित जोपासले आहे. दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नर्सरीने रविवारी (ता.31) बोनस आणि साखर वाटप केली आहे.
नर्सरीच्या सभागृहात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सर्वांना बोनस व साखर वाटप करण्यात आली. यावेळी नर्सरीचे संचालक नानासाहेब थोरात, देवयानी थोरात, वीरेंद्र थोरात, मुख्य व्यवस्थापक अविनाश बोडखे, सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, लेखापाल लहुजी दातखिळे, गुणवत्ता नियंत्रण विभागप्रमुख भानुदास भालेराव, बियाणे रोपण विभागप्रमुख योगेश देशमुख, विपणन व्यवस्थापक अविनाश भागवत, विक्री व्यवस्थापक संतोष भालेराव यांसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी हंगाम यशस्वी केल्याबद्दल संचालक वीरेंद्र थोरात यांनी सर्वांचे मनापासून आभार मानत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.