इतिहासाची साक्ष देणारी वास्तू म्हणजे ‘गढी’!

जहागीरदार थोरात घराण्याच्या इतिहासाची साक्ष देणारी वास्तू म्हणजे ‘गढी’! याच परंपरेतील वीरगाव (ता.अकोले) येथील गढी देखील शिवकालीन आठवणींना जागृत करते. हा समृद्ध वारसा जहागिरदार थोरातांचे एक अलौकिक वैभव आहे. म्हणूनच दरवर्षी विजयादशमीला सगळे जहागिरदार थोरात बंधू पारंपरिक पद्धतीने नवीन ध्वजाचे पूजन करून दिमाखात फडकावतात आणि शस्राचेही पूजन करतात. ही परंपरा आजही जपली असून, यंदा भगवानराजे थोरात यांना सपत्नीक मान मिळाला. यावेळी सर्व जहागिरदार थोरात बांधव व ग्रामस्त उपस्थित होते. विशेषतः या वास्तुमुळे वीरगावच्या वैभवात भर पडलेली असल्याने तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी जहागिरदार थोरात बांधव प्रयत्नशील आहेत.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply