कृषीमंत्र्यांच्या हस्ते विश्व हायटेक नर्सरीच्या लोगोचे अनावरण

अकोले (प्रतिनिधी) –
येथील विठ्ठल लॉन्स नुकत्याच पार पडलेल्या कळस कृषी व डेअरी प्रदर्शनात वीरगाव (ता. अकोले) येथील विश्व हायटेक नर्सरीच्या नूतन लोगोचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

गेल्या वीस वर्षांपासून विश्व हायटेक नर्सरी शेतकऱ्यांना रोपे पुरविण्याची सेवा देण्याबरोबर मार्गदर्शन करत आहे. याशिवाय शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रमही राबवत आहे. दरवर्षी भरणाऱ्या कळस कृषी प्रदर्शनात नर्सरी सहभाग घेत आहे. यंदा देखील अकोलेतील विठ्ठल लॉन्स येथे पार पडलेल्या कळस कृषी व डेअरी प्रदर्शनात नर्सरीने स्टॉल लावला होता, हा अनोखा स्टॉल पाहून शेतकऱ्यांसह अभ्यागतांकडून कौतुक झाले. तत्पूर्वी नर्सरीने आपला नवीन लोगो तयार केला असून, याचे अनावरण कृषीमंत्री कोकाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, आबासाहेब थोरात, दिलीप शिंदे, द्राक्ष बागायतदार संघटनेचे कैलास भोसले, प्रदर्शनाचे आयोजक सागर वाकचौरे आदी उपस्थित होते.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply