विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक थोरात यांचा सत्कार

विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक थोरात यांचा सत्कार


महेश पगारे, वीरगाव

महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्ट अप फेडरेशन, धरती शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि. व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने नुकतेच महाराष्ट्रातील अकरा उपक्रमशील कृषी उद्योजक व विस्तारक यांना ‘नॅशनल बिझनेस आयकॉन ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. यामध्ये विश्‍व हायटेक नर्सरीचा समावेश होता. याबद्दल संगमनेर तालुक्यातील निमज सेवा सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रगतिशील शेतकरी तुकाराम गुंजाळ यांनी नर्सरीचे संचालक थोरात यांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा देऊन गुरुवारी (ता.2) सत्कार केला.

 

विश्‍व हायटेक नर्सरीने गेल्या सोळा वर्षांत महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन केलेला आहे. उच्च दर्जाची रोपे माफक दरात थेट बांधावर पोहोच करतात व वेळोवेळी मार्गदर्शन करत असल्याने असंख्य शेतकरी जोडले गेले आहे. याच कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र एफ. पी. ओ. स्टार्ट अप फेडरेशन, धरती शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि. व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी नर्सरीला ‘नॅशनल बिझनेस आयकॉन ॲवॉर्ड’ने गौरविले आहे. यामुळे नर्सरीच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबद्दल निमज सेवा सोसायटीचे अध्यक्ष तथा प्रगतिशील शेतकरी तुकाराम गुंजाळ, सांगवीचे सरपंच नवनाथ कातोरे, धांदरफळ खुर्द येथील सेवा सोसायटीचे अध्यक्ष शरद कोकणे, निमज ग्रामपंचायत सदस्य अरुण गुंजाळ व दीपक गुंजाळ यांनी विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक थोरात यांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा देऊन सत्कार केला. या सत्काराने भारावून गेलो असल्याची प्रतिक्रया सत्कारमूर्ती थोरात यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी नर्सरीचे मुख्य व्यवस्थापक अविनाश बोडखे, सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, गुणवत्ता नियंत्रक व्यवस्थापक भानुदास भालेराव, लेखापाल लहुजी दातखिळे, बियाणे विभाग प्रमुख योगेश देशमुख, विक्री व्यवस्थापक संतोष भालेराव, विपणन व्यवस्थापक अविनाश भागवत, विपणन विकास अधिकारी वैभव भारती, दिलीप उघडे, संतोष अस्वले, सागर देशमुख, रवींद्र आंबरे, सागर वाकचौरे, योगेश सावंत, सुमित मेंगाळ, किशोर वाकचौरे, धनेश मालुंजकर, श्रीराम अस्वले, लक्ष्मण धोंगडे, गणेश थोरात, वैभव पवार, संदीप माळी, जयदीप खुळे, मेघा आहेर, अश्‍विनी दातीर, सविता जोशी, मुक्ता सोनवणे आदी उपस्थित होते.

 

 

 

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply