विश्‍व हायटेक नर्सरीमध्ये बाप्पांची जल्लोषात प्रतिष्ठापना

विश्‍व हायटेक नर्सरीमध्ये बाप्पांची जल्लोषात प्रतिष्ठापना


वीरगाव/प्रतिनिधी


गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट सुरू असल्याने सर्वच सण-उत्सवांवर मर्यादा आलेल्या आहेत. अद्यापही कोविडचे सावट असल्याने शासनाने गणेशोत्सवार निर्बंध लादले आहेत. त्यानुसार नियमांच्या अधीन राहून विश्‍व हायटेक नर्सरीमध्ये श्री गणेशाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली.


दरवर्षी गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र कोरोना विषाणूंमुळे या आनंदावर काही बंधने आलेली आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नियम पाळणे हाच एकमेव कोरोनावर पर्याय असल्याने शासनाने गणेशोत्सवावर निर्बंध लादलेले आहेत. त्यानुसार विश्‍वासाचं एकच नाव असलेल्या विश्‍व हायटेक नर्सरीमध्ये बाप्पांचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजा-अर्चा करुन बाप्पांची प्रतिष्ठापना झाली. यावेळी नर्सरीचे मुख्य व्यवस्थापक अविनाश बोडखे, सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, लेखापाल लहुजी दातखिळे, गुणवत्ता नियंत्रक प्रमुख भानुदास भालेराव, विपणन व्यवस्थापक अविनाश भागवत, विक्री व्यवस्थापक संतोष भालेराव, बियाणे रोपण विभाग प्रमुख योगेश देशमुख, विपणन प्रतिनिधी वैभव भारती, सागर वाकचौरे, संतोष अस्वले, ऋषीकेश चौधरी, विक्री प्रतिनिधी रवी आंबरे, मेघा आहेर, अश्‍विनी दातीर, सागर देशमुख, सुमित मेंगाळ, राम अस्वले, लतेश गायकवाड, सुनील दातीर, मुक्ता सोनवणे, सोनाली वाकचौरे, संदीप माळी, गणेश थोरात, वैभव पवार, जयदीप खुळे, अरुण भुतांबरे, धनेश मालुंजकर, अनिल तोरमल, सुरक्षा रक्षक सोमनाथ आंबरे आदी उपस्थित होते.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply