टोमॅटो पिकावर येणाऱ्या तिरंगा रोगाची कारणे व उपाय…
मागील लेखात आपण टोमॅटो पिकातील सीएमव्ही या विषाणूजन्य रोगाची माहिती घेतली. त्यानंतर सर्वात जास्त टोमॅटो पिकात त्रास देणारी समस्या म्हणजेच फळावर येणाऱ्या तिरंगा रोगाची समस्या होय. टोमॅटो उत्पादक सर्वच शेतकऱ्यांना याला सामोरे जावे लागते. टोमॅटो पिकात फळाची तोडणी सुरू झाल्यानंतर साधारणतः 5 ते 80 टक्के नुकसान या रोगामुळे होते. फळ तोडणीस आल्यानंतर फळाचा रंग लाल न होता तो हिरवा, हळदी पिवळा, फिक्कट लाल अशाप्रकारे होतो. त्याची व्रिकी मार्केटमध्ये करता येत नाही. आपले पूर्णपणे नुकसान होते. ही समस्या टोमॅटो पिकातील सर्व जातींमध्ये दिसून येते. आत्ता आपण त्यामागील कारणे व उपाय यांवर माहिती घेऊ…
- टोमॅटो फळाला लाल रंग हा लायकोपीन या घटकामुळे येतो. तसेच बऱ्याच फळांमध्ये लाल रंग लायकोपीनमुळेच येतो. या लायकोपीनच्या निर्मितीसाठी पोटॅश या घटकाची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. जर पोटॅशची मात्रा कमी असेल तर त्याच्या कमतरतेमुळे लायकोपीन निर्मितीत अडथळे येतात आणि लायकोपीन निर्मिती न झाल्यामुळे फळास लाल रंग येत नाही.
- बऱ्याच शेतकऱ्यांचे टोमॅटो पिकातील खतांचे व्यवस्थापन बघितले असता पोटॅश खताची मात्रा ही 40 ते 50 दिवसांनंतर सुरू होते. खरेतर पोटॅश खत टोमॅटो पिकात सुरुवातीच्या कालावधीपासून दिले गेले पाहिजे. बेसल डोसमध्ये पण पोटॅशचा वापर झाला पाहिजे.
- पोटॅश खत टोमॅटो पीक घेताना त्याबरोबर नत्र असले तर त्याचे वहन खूप चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे पोटॅश देताना 130045ःः या खताचा वापर करावा.
- वीरेंद्र थोरात-संचालक विश्व हायटेक नर्सरी, वीरगाव (9850530136)
रोपे बुकिंगकरिता संपर्क क्रमांक – 8888801892/93
अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक – 8888801890/91