विश्व हायटेक नर्सरीतील गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप
वीरगाव/प्रतिनिधी
शेतकऱ्यांचं जीवन समृद्ध करण्याचा वसा घेतलेल्या वीरगावच्या (ता.अकोले) विश्वासाचं एकच नाव विश्व हायटेक नर्सरी येथील विराजमान गणरायाचे दहा दिवसांच्या मुक्कामानंतर विधीवत पूजा-अर्चा करुन भक्तीमय वातावरणात रविवारी (ता.19) विसर्जन करण्यात आले.
यंदा कोविडचे सावट असल्याने राज्य शासनाने गणेशोत्सवावर निर्बंध लादलेले होते. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. त्यास प्रतिसाद देत विश्व हायटेक नर्सरीमध्ये गणरायाची परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध मान्यवरांच्या हस्ते दैनंदिन आरती झाली. त्यानंतर शेवटच्या दिवशी नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात आणि सहचारिणी ज्योत्स्ना थोरात यांच्या हस्ते आरती झाली. प्रसाद वाटप झाल्यानंतर गणेशाच्या विसर्जनासाठी सर्वांचीच लगबग झाली. गणरायाची विधीवत पूजा-अर्चा करुन जड अंतःकरणाने भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी नर्सरीचे मुख्य व्यवस्थापक अविनाश बोडखे, सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, भानुदास भालेराव, अविनाश भागवत, संतोष भालेराव, योगेश देशमुख, वैभव भारती, रवी आंबरे, सागर देशमुख, सुमित मेंगाळ, संदीप माळी, गणेश थोरात, जयदीप खुळे, सोमनाथ आंबरे आदी उपस्थित होते.