वीरगावच्या गढीला विजयादशमीनिमित्त पुष्पमाला अर्पण करुन ध्वजारोहण

वीरगावच्या गढीला विजयादशमीनिमित्त पुष्पमाला अर्पण करुन ध्वजारोहण

वीरगाव/प्रतिनिधी

तालुक्यातील वीरगाव येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या गढीला विजयादशमीनिमित्त जहागिरदार उदोजी थोरात व रंजना थोरात यांनी विधीवत पूजाअर्चा करुन पुष्पमाला अर्पण करत ध्वजारोहण केले.

साधारण 1620 ते 1630 या शिवपूर्वकाळात भुईकोट किल्लारुपी गढीची निर्मिती झालेली आहे. अतिशय भव्यदिव्य देखणी वास्तू असलेली गढी उंचच उंच बुरुंज, दगडी बांधकाम, कोरीव काम, अभेद्य तटबंदी अशा वैविध्यपूर्ण कलात्मकतेची अनुभूती आजही देते. पूर्वी जहागिरदार थोरात यांचे हे निवासस्थान होते. गेल्या वर्षापासून थोरात कुटुंबियांनी गढीचा जिर्णेाद्धार करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत बऱ्यापैकी काम पूर्णत्वास गेले आहे. दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक वारसा असल्याने पुष्पमाला अर्पण करुन भगवा ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. ती आजतागायत सुरू आहे. यंदाही ही परंपरा कोविड नियमांचे पालन करुन जपली आहे. यावेळी गुलाब थोरात, वीरेंद्र थोरात, भगवान थोरात, राजेंद्र थोरात, संजय थोरात, रमेश थोरात, अभिजीत थोरात, संदीप थोरात, संदेश थोरात, ऋषीकेश थोरात, हर्षल थोरात, कौस्तुभ थोरात, विद्या थोरात, रुपाली थोरात, वर्षा थोरात, कविता थोरात, छाया थोरात, ऐश्‍वर्या थोरात, भक्ती थोरात, ऋतुजा थोरात, कांचन थोरात, शर्वरी थोरात आदी उपस्थित होते.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply