अरुण गुंजाळ, शरद कोकणे यांचा विश्व हायटेक नर्सरीकडून सत्कार
वीरगाव/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील निमज येथील प्रगतिशील शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य अरुण गुंजाळ यांची नुकतीच तालुकास्तरीय प्राथमिक शिक्षण सल्लागारपदी तर धांदरफळ सेवा सोसायटीचे अध्यक्ष शरद कोकणे यांची काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विश्व हायटेक नर्सरीच्यावतीने संचालक वीरेंद्र थोरात यांनी यथोचित सत्कार केला.
शनिवारी (ता.30) निमज येथील माऊली फार्म येथे छोटेखानी स्वरुपात पार पडलेल्या सत्कार सोहळ्यासाठी संगमनेर शेतकी संघाचे उपाध्यक्ष संपत डोंगरे, वीरभद्र पतसंस्थेचे अध्यक्ष रामनाथ डोंगरे, सांगवीचे सरपंच नवनाथ कातोरे, वीरभद्र पतसंस्थेचे उपाध्यक्ष विजय गुंजाळ, निमज ग्रामपंचायत सदस्य सागर डोंगरे, विश्व हायटेक नर्सरीचे सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, क्षेत्रीय अधिकारी दिलीप उघडे आदी उपस्थित होते. यानंतर विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी माऊली फार्मच्या टोमॅटो बागेची पाहणी करुन मार्गदर्शन केले.