सुंदर ग्राम स्पर्धेच्या पथकाची विश्व हायटेक नर्सरीला भेट
वीरगाव/प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतने सुंदर ग्राम स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यानिमित्ताने गावात झालेल्या विविध लोकाभिमुख कामांची बुधवारी (ता.1) स्वर्गीय आर. आर. पाटील सुंदर गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय पथकाने पाहणी केली. यावेळी विश्व हायटेक नर्सरीलाही भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पथकातील अधिकाऱ्यांचा नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी सत्कार केला.
या पथकातील कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कृषी अधिकारी साबळे, संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वाकचौरे, अकोले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सरोदे यांनी नर्सरीतील पॉलिहाऊस, टनेलहाऊसला भेट देऊन पाहणी केली. तसेच सर्वच विभागांच्या व्यवस्थापनाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, उपसरपंच संजय थोरात, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक देशमुख, संतोष अस्वले, कर्मचारी संदीप रसाळ, नर्सरीचे सामान्य मुख्य व्यवस्थापक अविनाश बोडखे, सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, गुणवत्ता नियंत्रण विभागप्रमुख भानुदास भालेराव, लेखापाल लहुजी दातखिळे, विपणन व्यवस्थापक अविनाश भागवत, विक्री व्यवस्थापक संतोष भालेराव, वैभव भारती, सागर वाकचौरे, सुमित मेंगाळ आदी उपस्थित होते.