स्त्रियांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व द्यावे ः थोरात

स्त्रियांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व द्यावे ः थोरात

अकोले / प्रतिनिधी

आज सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. तरी देखील स्त्रियांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व द्यावे आणि सक्षम बनावे. याचबरोबर आपल्या कुटुंबालाही साक्षर करावे, असे प्रतिपादन विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विश्‍व हायटेक नर्सरीमध्ये (ता.अकोले) महिलांचा ॲप्रॉन आणि स्कार्फ भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संचालक थोरात यांनी महिलांचे विविध क्षेत्रांतील योगदान अधोरेखित केले. तसेच स्त्री-पुरुष समानता विशद करुन स्त्रियांनी शिक्षण घेऊन साक्षर बनावे. अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहन केले. यावेळी महिलांनी देखील स्त्रियांचे महत्त्व व कार्य अधोरेखित केले. नर्सरीचे सामान्य व्यवस्थापक कमलेश ठोंबरे, गुणवत्त नियंत्रण विभाग प्रमुख भानुदास भालेराव, लेखापाल लहुजी दातखिळे, बियाणे विभागप्रमुख योगेश देशमुख यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply