Notice: Undefined index: in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 30

Notice: Trying to get property 'slug' of non-object in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 36

नवीन ध्येय, नवीन तंत्रज्ञान…

अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणून बळीराजाला ओळखले जाते. याच बळीराजाची उन्नती करण्यसाठी 30 मार्च, 2006 रोजी विश्‍व हायटेक नर्सरीची स्थापना झाली. बघता-बघता आज तब्बल सोळा वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या कालावधीत असंख्य चढ-उतार आले. परंतु, मोठ्या धैर्याने आणि हिंमतीने नर्सरीने आपली वाटचाल सुरूच ठेवली. केवळ 5 गुंठे क्षेत्रावर सुरू झालेल्या नर्सरीचा डोलारा आता 16 एकरावर पसरला आहे. यामध्ये प्रमुख घटक असलेला शेतकरी व नर्सरीसाठी राबणाऱ्या हजारो हातांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

अगदी प्रारंभापासूनच नर्सरीने प्रगत तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. त्यानुसार पॉलिहाऊस, टनेलहाऊस, आरओ पाणी प्रकल्प, सीड्स सुर्इंग मशीन, स्प्रिंकलर, यंत्राद्वारे फवारणी आदी तत्सम संसाधनांचा कुशल वापर केला जात आहे. यासाठी रोज हजारो हात परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे नर्सरीच्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा समन्वयाने उत्तम काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना जलद सेवा देता येत आहे. ‘विश्‍वासाचे एकच नाव’ हे ब्रीद स्मरण करुनच नर्सरीतील प्रत्येक घटक उत्तम आचारसंहितेचे पालन करुन लौकिक वाढविण्यास प्रयत्नशील आहे.

‘गुणवत्ता, विश्‍वासार्हता व माफक दर’ या त्रिसूत्रीनुसार नर्सरी व्यवस्थापन शेतकऱ्यांचे हित जपत आहे. जगभरातील नामांकित कंपन्यांची बियाणे, उत्कृष्ट प्रतीचे कोकोपीठ, विविध आकारांतील ट्रे वापरली जातात. यामुळे गाव, तालुका, जिल्हा, राज्य नव्हे तर देशात विश्‍व हायटेक नर्सरीची रोपे जलदरित्या वितरित होत आहे. यामुळेच असंख्य शेतकऱ्यांशी नर्सरीचा ग्राहक म्हणून नाही तर परिवारातील सदस्य म्हणून स्नेह जुळला आहे. विनम्र व जलद सेवा देण्याबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पीक पाहणी आणि योग्य मार्गदर्शनही करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांशी स्नेह अधिक दृढ झाला आहे.

 

भाजीपाला पिकांसह झेंडूची रोपेही शेतकऱ्यांना मिळत आहे. यामध्ये अधिक भर तथा नर्सरीचे नवीन ध्येय म्हणून वातानुकूलित पॉलिहाऊस प्रकल्पामधून आता टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची यांची ग्राफ्टिंग (कलम) तर शेवंती व कलकत्ता झेंडूची कटिंग रोपे उपलब्ध होणार आहे. नर्सरीच्या सोळा वर्षांच्या प्रवासातील हा पुढचा टप्पा आहे. आजवर नर्सरेी नावाप्रमाणेच हायटेक राहण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकत आली आहे. यापुढेही नर्सरी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी समर्पित भावनेने अवितरपणे काम करत राहील. आणि अशाच नवनवीन ध्येयांची पूर्तता करण्यासाठी तंत्रज्ञानाला स्वीकारुन पुढचा टप्पा गाठत राहील. आज गुढीपाडव्याला तिथीनुसार नर्सरी सोळा वर्षांचा प्रवास करुन सतराव्या वर्षात प्रवास करत आहे. आजपर्यंत नर्सरीने जपलेला विश्‍वास, गुणवत्ता व विनम्र सेवा हे कायम ठेवून मिळत असलेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल नर्सरी कायमच आपल्या ऋणात राहील.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply