टोमॅटोवरील चर्चासत्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वीरगाव / प्रतिनिधी

फ्रुटवाला बागायतदारच्या माध्यमातून एफएमसी, पॅनझेन फर्टिलायझर आणि विश्‍व हायटेक नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने रोहकडी (ता.जुन्नर) येथे टोमॅटो पीक पाहणी व चर्चासत्र गुरुवारी (ता.12) आयोजित करण्यात आले होते. त्यास राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

फ्रुटवाला बागायतदारच्या माध्यमातून शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांची मिळून टोमॅटोवर काम करण्यासाठी ‘टोमॅटो टास्क फोर्स’ तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार टोमॅटो शेतीमध्ये कसे काम करावे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली होती. ही तत्त्वे शेतावर राबवली जातात ते पाहण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डॉ. अंकुश चोरमुले, डॉ. प्रफुल्ल गाडगे, वीरेंद्र थोरात, अजित घोलप या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करत टोमॅटोतील बारकावे समजावून सांगितली. शेवटी अशा उपक्रमांचा शेतकऱ्यांना नक्कीच उपयोग होईल. त्यासाठी असे उपक्रम यापुढेही आयोजित करावे, असा आग्रह धरला.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply