Notice: Undefined index: in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 30

Notice: Trying to get property 'slug' of non-object in /home4/mywebffu/public_html/vishwahitechnursery.com/wp-content/themes/zota/page-templates/parts/device/offcanvas-smartmenu.php on line 36

संटूआई मंदिरासह परिसर पाहून प्रत्येक भाविक सुखावेल ः थोरात

 

विश्‍व हायटेक नर्सरीकडून मंदिरास 11 हजार 111 रुपयांची देगणी

अकोले / प्रतिनिधी

आढळा परिसरच नव्हे तर राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव निपाणी (ता.अकोले) येथील संटूआई देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाने मंदिर व परिसराचे केलेले सुशोभीकरण वाखणण्याजोगे आहे. इथे येणारा प्रत्येक भाविक हा नयनरम्य परिसर पाहून नक्कीच सुखावेल, असे प्रतिपादन विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी केले.

पिंपळगाव निपाणी येथे एका विवाहानिमित्त विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात उपस्थित होते. त्यावेळी संटूआई देवीचे मंदिर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या चार दिवसांवर यात्रा असून, तत्पूर्वीच मंदिर व परिसराचा विश्‍वस्त मंडळाने कायापालट केला आहे. यामध्ये असंख्य दानशूर भाविकांनी यथाशक्ती देणगी दिली आहे. त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा आणि धार्मिक कार्यात योगदान असावे या उदात्त हेतूने विश्‍व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनीही 11 हजार 111 रुपयांची देणगी विश्‍वस्त मंडळाकडे सुपूर्द केली. यावेळी विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डी. के. गोर्डे, सचिव सतीष वाकचौरे, सहसचिव दत्तात्रय मुंढे, रवी वाकचौरे, दत्तू शिवराम गोर्डे, अनुज गोर्डे, बाळासाहेब सहाणे, नर्सरीचे जनरल मॅनेजर कमलेश ठोंबरे, क्वॉलिटी कंट्रोल मॅनेजर भानुदास भालेराव, अकाऊटंट लहुजी दातखिळे, सीड्स सुर्इंग हेड योगेश देशमुख, सेल्स मॅनेजर संतोष भालेराव, फिल्ड ऑफिसर दिलीप उघडे, पीआरओ महेश पगारे, सेल्स एक्झिक्युटिव्ह रवींद्र आंबरे, सागर वाकचौरे, सुमित मेंगाळ, संगीता आंबरे, मुक्ता सोनवणे, शीतल दातीर, स्वाती ठोंबरे आदी उपस्थित होते.

vishwa hitechnursery

vishwa hitech

Leave a Reply